वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका नवनियुक्त पदाधिकारी सत्कार समारंभ संपन्न

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके):वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व पुणे जिल्हा प्रभारी प्रा. किसन चव्हाण सर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका नियुक्त पदाधिकारी निवड झाल्यानंतर बावडा या ठिकाणी पुणे जिल्हा अध्यक्ष राज कुमार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्याच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बावडा गावातून महापुरुषांच्या घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली व आलेल्या मान्यवरांचा सत्कार करून वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी स्वराज्य नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आकाश पवार, भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष महेंद्र भोसले, जिल्हा महासचिव सतीश साळवे, जिल्हा उपाध्यक्ष रणजीत पाडळे, जिल्हा संपर्कप्रमुख ॲड वैभव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली.

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष मिसाळ यांनी केले. यावेळी जिल्हा सचिव गोविंद कांबळे, तसेच तालुका महासचिव विशाल सोनवणे, उपाध्यक्ष दादा खरात, राजेंद्र जगताप कायदेशीर सल्लागार ॲड संतोष कांबळे, प्रसिद्धीप्रमुख राहुल कांबळे, सचिव संजय धिमधीमे, तय्यब शेख, अरुण भिंगारदिवे, अकलूज शहराध्यक्ष सुनील कांबळे, संतोष वाघमारे, उमेश जगताप, विशाल कांबळे, सुरेश कांबळे, तसेच इंदापूर तालुक्यातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!