पुणे (ऑनलाईन): अनुसूचित जाती जमाती आरक्षण परिषदेचे आयोजन 22 सप्टेंबर 2024 रोजी दु.12 वा मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, कोरेगाव पार्क याठिकाणी करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील याच्या शुभहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीतज्ञ ऍड.डॉ.सुरेश माने तर प्रमुख अतिथी म्हणून विद्याभूषण डॉ.प्रशांत पगारे व कोब्रा राजे भारतीय दलित कोब्राचे ऍड.विवेक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
आर्थिक निकष, आरक्षणाचे उपवर्गीकरण, संविधानात्मक आरक्षण धोरणाविरोधातील षडयंत्र व न्यायालयाची भूमिका या विषयावर बोलण्यासाठी पुणे आयएलएस लॉ कॉलेजचे डॉ.नितीश नवसागर, पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते रामेश राक्षे, पुणे यशदा संशोधन अधिकारी डॉ.बबन जोगदंड, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्स सिटीचे डॉ.संजय कांबळे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा प्रशिक्षण संस्थेचे विजय कांबळे हे वक्ते आपले परखड मत व्यक्त करणार आहेत.

या परिषदेचे आयोजन सचिन गजरमल, सागर सपकाळ, ऍड.अंबादास बनसोडे, डॉ.संग्राम साळवे, स्वातीताई गायकवाड, अर्चना केदारी, ऍड.विजय खरात, विजय गायकवाड यांनी केले.

या परिषदेस पुण्याचे माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, इंटरनॅशनल स्कुल हुलगेश चलवादी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना राज्याचे अध्यक्ष विवेक बनसोडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ.प्रा.प्रविण रणसुरे, कस्ट्राईब पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप पवार, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रविण दिवार, रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोडे, पुणे कॉन्टोमेंट बोर्ड उपाध्यक्ष रोहिदास गायकवाड, बौ.विकास महासंघ अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, पुणे विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे सुनिल धिवार, बहुजन शिक्षक संघ गौतम बेंगाळे, भिमा कोरेगाव रणस्तंभाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, क्रांती मजदूर सेनाचे अध्यक्ष अर्जुन ओव्हाळ, आंबेडकरी विचारवंत मिलिंद तायडे, दलित पँथर संघटनेचे युवराज भोसले, ऍड.पंचशीला कुंभारकर, दलित पँथर अध्यक्ष अंबादास शिंदे, आदिवासी सेवा संघाचे अनिल तिटकारे, महार वतन अधिकार परिषदेचे दिलीप गायकवाड, अधिकारी कर्मचारी संघाचे पांडूरंग शेलार, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सुनिता अडसुळ, महार वतन अधिकार परिषद अभियंता चंद्रशेखर जावळे, पुणे ब्लड बँकेचे समन्वयक अरूण चांदेकर, रिपब्लिकन इम्पलॉईज फेड्रेशनचे सरचिटणीस राम सर्वगोड, शैलेंद्र निकाळजे, महार वतन अधिकार परिषदेचे बुद्धघोष घाटे, शिक्षण हक्क हायकोर्ट याचिकाकर्ता ऍड.अश्र्विनी कांबळे इ. मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या परिषदेत आझाद समाज पार्टी पुणे, बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आय), रिपब्लिकन विद्यार्थी सेना महा.राज्य, कास्ट्राईब संघटना कर्मचारी महा.राज्य, बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड, महार वतन अधिकार परिषद, रिपब्लिकन चर्मकार महासंघ, आदिवासी सेवा संघ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा प्रशिक्षण संस्था, एल.आय.सी.कर्मचारी संघटना पुणे, संविधान ग्रुप, एस.सी. व एस.टी. रेल्वे एम्लोईज असोसिधान या संघटना सहभागी होणार आहेत.
या परिषदेचे संयोजक अनुसूचित जाती-जमातील सर्व पक्ष, संघटना, सामाजिक, राजकीय, धार्मिक शैक्षणिक, अधिकारी, कर्मचारी व सर्व बुद्ध विहार व मंडळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा यांनी केले आहे.