बारामती(वार्ताहर): महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, विमा काढणे, वृक्षारोपण व माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत नोंदणी करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
युवानेतृत्व जय पवार यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विशाल जाधव व मित्रपरिवार यांच्या वतीने बारामती येथील देसाई इस्टेट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जय पवार यांनी महिलांशी संवाद साधला. योजनेची सविस्तर माहिती घेऊन महिलांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. महिलांशी साधलेला संवाद व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

रक्तदान शिबीरात 265 रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला. 200 गरजूंना पोस्ट ऑफिसचा 800 रूपयांमध्ये दहा लाखाचा अपघाती विमाचे संरक्षण मिळवून दिले. 200 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची नोंदणी केली तर कार्यक्रम स्थळी खत्री पार्कच्या खुल्या जागेत जय पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या विधायक उपक्रमाचे जय पवार यांनी कौतुक केले. शेवटी विशाल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.