बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आलताफ सय्यद यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे गरजु लाभार्थ्यांना कर्ज मिळवून दिले या कार्याची दखल घेत मुस्लिम समाजाकडून कौतुकाची थाप मिळत असेल ही विशेष बाब असल्याचे मत बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी व्यक्त केले.

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे बारामतीतील गरजुंना प्रत्येकी 3 लाख प्रमाणे 4.5 कोटी मंजूर केलेने त्यांच्या जाहीर सत्कार एकता ग्रुप व परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी श्री.सातव बोलत होते.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील, युवक शहराध्यक्ष अविनाश बांदल, पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रताप पागळे, उद्योजक इरफान इनामदार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती कमरूद्दीन सय्यद, जमीर इनामदार, तैनुर शेख, परवेज सय्यद इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे श्री.सातव म्हणाले की, लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झालेनंतर, सदरचे मंजूर कर्ज प्रकरणाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली ही नोंद घेण्याची बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आलताफ सय्यद यांच्या कार्याचा प्रवास मी सगळ्यात जवळून पाहिला आहे. अत्यंत चिकाटीने काम करणारे आलताफ सय्यद आहेत. शिर्रर्खुमा बनविण्याच्या पदार्थापासुन कार्याची सुरूवात केली. या कार्याची दखल घेत दादांनी मुस्लीम बँकेत संचालक म्हणून आलताफला संधी दिली. तरन्नुम सय्यद यांना नगरपालिकेवर नगरसेवक ते उपनगराध्यक्ष पदापर्यंत संधी दिली. एकता पतसंस्था, एकता इंग्लिश मिडीयम स्कूल उभारली आहे.
250 प्रकरणे मंजूर झाली यापुढे 500 प्रकरणे मंजूर व्हावी. घेतलेले कर्ज नियमित फेडावे अन्यथा सिबील खराब होईल. याचा फटका तुमच्या कुटुंबाला बसेल असेही ते म्हणाले. या महामंडळाबरोबर इतर मागासवर्ग महामंडळ आहे त्याठिकाणी सुद्धा मुस्लीम समाजाला योजनांचा फायदा घेता येईल. बँकांचे कर्ज नियमित हप्ता न चुकता फेडल्यास ते कर्ज बिनव्याजी मिळते. नुकताच सर्व समावेशक व फायदा होणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला आहे.
यावेळी जय पाटील, परवेज सय्यद, तैनुर शेख, प्रताप पागळे यांनी मनोगत व्यक्त केले.
आलताफ सय्यद सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, बारामती लोकसभा निवडणूकीचा निकाल विरोधात जावून सुद्धा अजितदादांनी कर्ज प्रकरणाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली ही खूप विशेष बाब आहे. पाठपुरावा, अधिकार्यांशी संवाद साधुन काम करणारा नेता म्हणजे अजितदादा आहे. 135 लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. बारामती तालुक्यात साडेसात कोटी रूपये महामंडळाचे आले. आजपर्यंत महामंडळातर्फे व्यावसायिक कर्जासाठी साडेसात कोटी तर 254 विद्यार्थ्यांना 10 कोटी शैक्षणिक कर्ज वाटप केले आहे. शिर्रर्खुमा पदार्थाचे वाटप, मोफत जातीचे दाखले, हजयात्रेसाठी पासपोर्ट काढून दिले. अशा कार्यक्रमातून वेगळी ओळख झाली. बारामती तालुक्यात 24 हजार मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे. त्यातील 50% मतदान झाले. परंतु, मुस्लीम समाजाने मतदान केले नाही असे म्हणणे खोटं ठरेल. परंतु, येणार्या विधानसभा निवडणूकीत त्याची कसर काढू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मेडदला अडीच एकर जागा घेऊन एन.ए. करून एकता हौसिंग सोसायटी केली. प्रत्येकी 1 गुंठा जागेत घरे बांधण्याचा मानस आहे येणार्या काही दिवसात बांधकाम परवानगी घेऊन त्याचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थित घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जाहीर सत्काराचे आयोजन केलेबाबत त्यांनी आयोजकांचे मन:पूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सुबहान कुरैशी यांनी मानले. जगदंबा मंगल कार्यालय जुना मोरगाव रोड बारामती याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बहुसंख्य मुस्लीम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.