बारामतीः येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षित गुरुपौर्णिमा 22 जुलै २०२४ रोजी महाविद्यालयांमध्ये संपन्न झाली.
विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान, व वाणिज्य महाविद्यालय, बारामती व क्विक हील यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षेसाठी सायबर सुरक्षा’ या कार्यक्रमा अंतर्गत आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी गुरुपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी केली. या गुरुपौर्णिमेनिमित्त सायबर जनजागृती करत शिक्षकांना शुभेच्छा पत्रे दिले.
शिक्षक हे सदैव आपणास जीवनामध्ये योग्य तेच मार्गदर्शन करतात. त्यांनी घालून दिलेले धडे आपल्याला सदैव लक्षात राहतात. त्यांच्या मार्फत हे सायबर शिक्षेचे धडे आणखी वेगवेगळ्या स्तरावर गिरवले जातील.
या कार्यक्रमात एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यानी 15 पेक्षा जास्त शाळा व महाविद्यालयामध्ये जाऊन सायबर सुरक्षीत गुरुपोर्णिमा साजरी केली. यात बारामती मधील 200 हून अधिक शिक्षकांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छा पत्र, ज्यामध्ये गुरुपुर्णिमेच्या शुभेच्छां बरोबरच सायबर सुरक्षेबद्दल माहिती देऊन वेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली; या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे शहरातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक केले गेले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, बीबीए (सीए) विभाग प्रमुख महेश पवार, प्रा. गजानन जोशी, प्रा. किशोर ढाणे, गौतम कुदळे, डॉ. जगदीश सांगवीकर यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमासाठी शिक्षक प्रतिनिधी, सलमा शेख यांनी समन्वयन केले. तसेच विशाल शिंदे, अनिल काळोखे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर, कांचन खिरे व अक्षय शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.