सायबर शिक्षण व सायबर सुरक्षा अभियानासाठी विद्या प्रतिष्ठानच्या चार विद्यार्थ्यांची निवड

बारामती: येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथील बी.बी.ए. (सी.ए.) विभागातील चार विद्यार्थ्यांची क्विक हिल फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणार्‍या ’सायबर शिक्षण व सायबर सुरक्षा’ या अभियानासाठी सायबर सुरक्षा क्लब ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये शिवानी छेडे, सागर मेरावी, रितेश धापटे, ऋतुजा कळसकर यांचा समावेश आहे. तर या अभियानासाठी शिक्षक समन्वयक म्हणून प्रा.सलमा शेख यांची निवड करण्यात आली आहे.

सायबर सुरक्षा क्लबचे प्रशिक्षण आणि ओरिएंटेशन, विमाननगर येथील क्विक हिल फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये झाले. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना अजय शिर्के, सुगंधा दानी, गायत्री केसकर यांनी मार्गदर्शन केले. क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

वरील निवड झालेले विद्यार्थी पुढील काही दिवस क्विक हिल फाउंडेशनच्या सायबर सुरक्षा जागरूकतेबद्दल विद्यार्थ्यांना आणि विविध सामाजिक घटकांना मार्गदर्शन करून त्यांच्यात सायबर जागरूकता निर्माण करण्याचे कार्य करतील.

प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी या प्रकल्पाबद्दल सांगितले की, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडावी. महाविद्यालयाचे हे दुसरे वर्ष आहे ज्यामध्ये महाविद्यालय क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सायबर जागरूकता अभियान राबवत आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.

सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, विभाग प्रमुख महेश पवार यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच विशाल शिंदे, अनिल काळोखे, पूनम गुंजवटे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर, कांचन खिरे, अक्षय शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले. उपक्रमाच्या यशासाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अँड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव ऍड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीष कंबोंज यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!