रेडा गावाच्या सरपंच सौ‌. सुनीता देवकर यांनी दिल्लीची लढाई जिंकली ; सत्यासाठी दिल्ली गाठली : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

इंदापूर (प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर तालुक्यातील रेडा गावातील ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी यांना सात जागांवर विजय मिळाला होता आणि विरोधक राष्ट्रवादीला दोन जागेवर विजय मिळाला होता‌. त्यानंतर राजकीय स्वार्थ पोटी, राजकीय खलबत्त करून नेमका शब्द कोणी कोणाला दिलाय हे सर्वसामान्य जनतेला आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांना माहित नाही‌. नेमका हा असा म्हणाला आणि तो असा म्हणाला,मी असं केलं, मी तसं केलं अशी उडवा उडवीची उत्तरे आणि गावात जिकडे तिकडे चर्चा ऐकायला मिळत होती.खर काय हे अजून नागरिकांना माहिती नसून नेमके काय कारण घडलं की, रेडा गावातील राजकारणाचा चिखल झाला आहे ‌.

काही जणांनी अनेक देवळातील देव खिशात घालून ओढ्या नाल्यात सोडले. ह्या देवाची शपथ घे, त्या देवाची शपथ घे,आले भाजप मधुन निवडणूक आणि पदा पायी ह्याचे तळवे चाट त्याचं पुढेपुढे लाळघोटेपणा कर , तुप मिळतंय म्हणून उष्ट चाटे पर्यंत पातळी गाठली.

त्यानंतर खोटेनाटे आरोप करून राजकीय वरदहस्तानी ग्रामसेवक हाताला धरून, गटविकास अधिकारी यांना हाताशी धरून लोकप्रतिनिधी,तालुका अध्यक्ष ,नातेवाईकांचा हातभार घेऊन आयुक्त, जिल्हा अधिकारी यांच्याकडे सरपंचाच्या विरोधात तक्रारी करून सरपंच आणि सदस्य पद रद्द करायला भाग पाडले‌. त्यानंतर अपिलात तक्रार करणे, वरिष्ठ कोर्टात न्याय मागण्यासाठी अपील करणे अशा घटना घडत गेल्या . पुणे आयुक्त यांच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर त्या निकालाच्या विरोधात हायकोर्टातून स्थगिती उठवण्यात आली होती.

रेडा गावच्या महिला सरपंच सौ. सुनीता देवकर ह्या हार मानतील त्या कसल्या..!! सत्यासाठी दिल्ली गाठली.

रेडा गावच्या महिला सरपंच सौ. सुनीता देवकर हार मानतील त्या कसल्या..!! सत्यासाठी दिल्ली थेट गाठली. ग्रामविकास मंत्र्याच्या निकालाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पार्टीने मुंबई उच्च न्यायालयातून दिलेल्या स्थगिती आदेशाला रेडा गावच्या सरपंच सौ.सुनीता देवकर यांनी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात अपील केले.

रेड्या गावच्या सरपंच सौ .सुनीता नानासाहेब देवकर आणि त्यांची पती नानासाहेब जालिंदर देवकर हे हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थ म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य सहकार्य यांनी हार न मानता थेट दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्या दादेला यश आले . अखेर रेड्या गावच्या महिला सरपंचांनी दाखवून दिलं सत्य सत्य असतं.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या सरपंच सौ. सुनीता नानासाहेब देवकर यांच्या अपिलाच्या वरती ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात स्थगित आदेश मिळवला होता. त्या स्थगिती आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे आणि पुन्हा रेड्या गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. सुनीता नानासाहेब देवकर यांची निवड झाली आहे. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात मुंबई उच्च निकाला स्थगिती आदेशाबाबत ताशेरे ओढण्यात आले असून दिल्ली सर्वोच्च न्यायालय म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या देशात असे म्हटले आहे की,

दरम्यान, दि.२० मार्च २०२४ रोजी मुंबई येथील उच्च न्यायलयाने पारित केलेल्या अस्पष्ट आदेशाची कार्यवाही स्थगित राहील. परिणामी, प्रभारी मंत्र्यांनी दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिलेली अंतरिम स्थगिती पुनर्संचयित केली जाईल आणि याचिकाकर्त्याला पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतीच्या सरपंचाची कर्तव्ये पार पाडण्याची परवानगी दिली जाईल. तथापि, गुणवत्तेवर अपीलाचा निर्णय घेण्याच्या सक्षम अधिकाऱ्याच्या मार्गात या कार्यवाही प्रलंबित राहणार नाहीत. असे सर्वोच्च न्यायालय यांनी आपल्या स्थगिती आदेशात म्हटले आहे.

रेडा गावाच्या सरपंच सौ‌ सुनीता देवकर यांनी दिल्लीची लढाई जिंकली..!!

शेवटी रेडा गावच्या सुनिता देवकर सरपंच यांनी दिल्लीची लढाई जिंकलीच आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने गावच्या सरपंच पदावर भाजपचे कट्टर सरपंच पुन्हा विराजमान झाले. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील रेडा गाव हे महाराष्ट्रात चर्चेत आले असून सरपंच पदासाठी दिल्लीत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोकवणारे गाव म्हणून ओळख झाली आहे. रेडा गावात एक हर्ष उल्हास,आनंद उत्सव केला जात आहे.अखेर सत्याचा विजय झाला अशा शब्दात सरपंच सौ.सुनीता देवकर यांनी आपली भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!