कारभारी प्रिमइर लिग (KPL) 2024 च्या माध्यमातुन बारामतीत रंगणार क्रिकेटचा थरार

बारामती(वार्ताहर): येथे दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यामध्ये कारभारी प्रिमइर लिगच्या (KPL) ने नावलौकीक मिळविला आहे. या माध्यमातून पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांना अनुभविण्यास मिळणार असल्याचे स्पर्धेचे आयोजन प्रशांत(नाना) सातव यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने दि.20 मार्च ते 4 एप्रिल 2024 दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम येथे कारभारी प्रिमइर लिग (KPL) 2024 च्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत संपूर्ण भारत देशातुन 16 नामांकीत खेळाडूंचा सहभाग स्पर्धेत भाग घेणार्‍या संघामध्ये होणार आहे.

या स्पर्धेमध्ये कर्नाटक, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगांव, बारामती, इंदापूर आशा विविध जिल्हा व परराज्यातून 100 हून अधिक रणजीपट्टूंचा भरणा असलेले संघ सहभागी झालेले आहेत.

या स्पर्धेच्या माध्यमातुन बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट खेळाडूंना भारतातील अनेक प्रतिभावान खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळून त्यांच्या क्रिकेटच्या ज्ञानामध्ये भर पडावी याकरिता दर वर्षी कारभारी प्रिमइर लिगचे आयोजन मोठ्या दिमाखात केले जाते.

स्पर्धेचे दिमाखदार आयोजन रक्कम रू.5.00 लाख व चषक इत्यादी भरघोस बक्षिसे तसेच स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या खेळाडूंकरीता बँ्रडेड कलर किट, भरघोस वैयक्तीक रोख बक्षिसे, एनर्जी ड्रिंक, फ्रुट बास्केट, प्रत्येक संघास 3 लिग मॅच, प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रीक बाईक, अंतर राष्ट्रीय दर्जाचे यु-ट्युब लाईव्ह प्रक्षेपण, सोशल मिडीया कव्हरेज, थर्ड अंपायर सुविधा, मान्यताप्राप्त अंपायर (पंच) अशा विविध वैशिष्टपूर्ण स्पर्धेचे संपूर्ण बारामती व पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांनी आनंद घ्यावा असेही आवाहन नाना सातव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!