बारामती: मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे मंजूर झालेल्या कर्ज मंजुरी पत्राचे वाटप व मुस्लीम समाजाचा मेळावा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूवार दि.14 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वा. डेंगळे गार्डन, माळेगाव रोड, कसबा बारामती याठिकाणी आयोजित केले असल्याचे मुस्लीम बँकेचे संचालक आलताफ सय्यद यांनी कळविले आहे.

बारामती शहरातील मुस्लीम समाजातील 150 छोट्या व्यावसायिकांना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रत्येकी 3 लाख रूपये प्रमाणे 4 कोटी 50 लाख रूपये कर्ज मंजूरी पत्राचे वाटप राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी मंत्री बाबा सिद्धीकी, बारामती हायटेक टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष इद्रीस नायकवडी, कार्याध्यक्ष वसीम बुर्हाण, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंगे्रस बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील इ. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या अल्पमुदत कर्जासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यापुर्वी सुद्धा अशाच प्रकारे बारामतीत 3 कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते यासाठी सुद्धा ना.अजित पवार यांचे सहकार्य लाभले होते. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी उपस्थित रहावे असेही आवाहन एकता ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.