बारामती(वार्ताहर): नदीम मुनीर कुरेशी यास कोयत्याने जखमी करून बेदम मारहाण करणारे अक्षय देवकाते, गौरव टिंगरे सह इतर आरोपी आजही मोकाट फिरत आहेत. यापैकी सौरभ पवार यास अटक करण्यात आली आहे.
सदरचे आरोपी शोधण्यामध्ये अडथळा निर्माण करणारा भिगवण पोलीस स्टेशनचाच एक पोलीस आहे ते पोलीस आरोपींना इत्यंभूत माहिती पुरवीत आहेत. त्यामुळे फिर्यादी बरोबर पोलीस असे का ङ्कवागलेङ्ख असा प्रश्र्न निर्माण होत आहे.
लाकडी-म्हसोबाची वाडी रोडवर शेतकर्याकडून खरेदी केलेली जनावरे घेऊन जाणार्या वाहनावर कोयत्याने हल्ला व बेदम मारहाण करून सोन्याची अंगठी, रोकड व दुचाकी घेऊन फरार झालेले आरोपी आजही मोकाट फिरत आहेत ते ही भिगवण पोलीस स्टेशनमधील एका पोलीसामुळे ही खेदाची बाब आहे.
आज घटना घडून 12 ते 13 दिवस उलटून गेली तरी सुद्धा आरोपीचा शोध लागत नसेल तर पोलीसांच्या कार्यावर संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधिक्षक यांना तातडीने आरोपी अटक करण्याचे आदेश देवूनही त्या आदेशाला पोलीसांनी केराची टोपली दाखविली आहे.
भिगवण पोलीस स्टेशन येथील आरोपींचा खबर्याची खातेनिहाय चौकशी करून निलंबन करावे तसेच सर्व आरोपींना तातडीने अटक न केल्यास ऑल इंडिया जमेतुल कुरेश समाजाच्या वतीने संपूर्ण भारतात आंदोलन छेडण्यात येईल असेही त्यांनी स्पीड पोस्टाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आरोपींच्या निकटवर्तींकडून पत्रकारांना धमक्या…
सदरचा प्रकार घडताच काही पत्रकारांनी निर्भिडपणे वृत्त प्रसिद्ध केल्याने आरोपींच्या निकटवर्ती यांचेकडून सोशल मिडीयावर हस्ते परहस्ते धमक्या देण्याचे काम काही समाजकंटकांनी केले आहे. या हल्लेखोरांवर व हल्लेखोरांना साथ देणार्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.