सगेसोयरे या शब्दाची व्याख्या मूळ ओबीसीवर अन्याय करणारी: ओबीसी समाज बांधवांच्या तीव्र प्रतिक्रीया

बारामती (प्रतिनिधी)ः सगेसोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मसूदा काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा असल्याची ओबीसी समाज बांधवांनी बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी मोठ्याा संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब दि. 26 जानेवारी 2024 नुसार मसूदा काढला आहे. शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे. मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेल्या या निर्णयाला ओबीसी बांधवांनी विरोध केला.

यावेळी बापूराव सोलनकर, रोहित बनकर, किशोर मासाळ, अनिल लडकत, गोविंद देवकाते, ज्ञानेश्वर कौले, जीबी गावडे, प्रियदर्शिनी कोकरे, निलेश टिळेकर, सचिन शाहीर, वनिता बनकर, देवेंद्र बनकर, रमेश कोकरे, नाना मदने, नवनाथ अपुणे, राजेंद्र बरकडे इ. तीव्र प्रतिक्रीया व्यक्ती केली.

संपूर्ण राज्यभरात आज ओबीसीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आमदार,खासदार आणि राज्यभरातील मंत्री यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ओबीसी समाजाने आंदोलन केले आहे.

मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत त्यासंबंधीचा अध्यादेश काढल्यानंतर राज्यभरातील ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये अषीही मागणी करण्यात आली. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, रद्द करा..रद्द करा..सगेसोयरेचा मसुदा रद्द करा अषा घोषणाने परिसर दणाणून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!