कृषी, अर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे खरे विकासरत्न हर्षवर्धन पाटील

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): कृषी, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून राजकीय क्षेत्रात सर्वांना बरोबर घेऊन आगळा वेगळा ठसा उमटविणारे विकासरत्न हर्षवर्धन पाटील आहेत. आज 21 ऑगस्ट त्यांचा 60 वा वाढदिवस सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात आहे.

हर्षवर्धन पाटील यांना सर्व आदराने भाऊ या नावाने ओळखतात. त्यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या कामामुळे आधारस्तंभ, दूरदृष्टी असणारे नेते, इंदापूर तालुक्याचा सर्वांगिण विकास साधणारे विकासपुरूष, बावडयाचा विठ्ठल अशा उपमाने त्यांचा जयघोष केला जातो.

बावड्यातील कै.शहाजीराव पाटील आणि रत्नप्रभादेवी पाटील यांचे पोटी जन्मलेले हर्षवर्धन पाटील आहेत. प्रत्येक क्षेत्रात जातीने लक्ष घालून त्या क्षेत्रात येणारे अडथळे दूर करणारे हर्षवर्धनभाऊ आहेत. त्या क्षेत्राचा विकास कसा होईल यासाठी सतत प्रयत्न करीत असतात.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांना संपूर्ण इंदापूर तालुका मोठे भाऊ म्हणून संबोधतात ते कै.शंकराव पाटील होते. तालुक्यात कृषी, शैक्षणिक, युवा रोजगार निर्मिती करुन त्यांनी कामास सुरुवात केली. नामवंत वकील म्हणून ते प्रचलीत होते. या वकीली पेशातून सर्वसामान्य नागरीकांना न्याय देता-देता या कार्याला कॉंग्रेस पक्षाची जोड मिळाली. 1962,च्या दुष्काळात नागरिकांना फार मोठ्या झळा बासल्या. 1962 ते 1972, 75 च्या काळात शेतीला तर पाणी नव्हतेच पण जनावरे व नागरिकांचे चारा, अन्न पाण्या वाचुन हाल होऊ लागले. लोकांना दोन वेळच्या जेवणासाठी हाताला मिळेल ते काम करावे लागत होते.पोटाची खळगी भरण्यासाठी सालाने रहावे लागत होते. या परिस्थितीत मोठ्या भाऊंना नागरिकांचे हाल पाहुन खुप वेदना झाल्या.या वाईट प्रसंगातुन इंदापुरच्या जनतेला बाहेर ’ काढण्यासाठी पिण्यास व शेतीला पाणी मिळवुन देणे हाच पर्याय होता. मोठ्या भाऊंनी यावर बरोबर असणार्‍या सवंगड्याशी चर्चा करुन आणि राजकीय क्षेत्रातील कॉंग्रेस पक्षाचे नेते व सरकार मधील पदाधिकारी यांचे शी बोलुन भिमा नदीवर धरण बांधण्याचा प्रस्ताव ठेवला.स्व.इंदिराजी गांधी यांचे केंद्रीय मंञी मंडळात आसताना उजनी गावा जवळ असणारे सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातील सीमेवर उजनी धरण बांधण्यास मिळवुन घेत त्याचे काम पुर्ण केले. आणि इंदापुर, माढा, करमळा, या तालुक्याच्या सह अनेक गावातील जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्ना बरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. शेतीला पाणी मिळाले त्याच बरोबर वीजेची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतात हिरव सोन पिकण्यास सुरुवात झाली. शेतात पिकलेला मालास बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघ स्थापन केला.शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय वाढीस चालना दिली. शेतात पिकणार्‍या उसाचे गाळप आपल्या च तालुक्यात व्हावे त्यातुन तरुण युवकांना रोजगार ही प्राप्त होईल म्हणून वालचंदनगर कंपनीचा बंद पडलेला साखर कारखाना विकत घेऊन सभासदांचे जोरावर बीजवडी येथे तो स्थापन केला. शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी, उत्पादीत होणार्‍या मालास योग्य भाव मिळत असल्यामुळे नागरीकांचे हातात चार पैसे खेळाय लागले त्यातुन तालुकातील युवकांना तालुक्यातच चांगले दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. यातुन तालुक्याचा सर्वांगीन विकास होऊ लागला.

ब्रिटिशांच्या काळातील भाटघर धरनाच्या निर्मितीने निरा डावा कालव्या द्वारे व खडकवासला कालव्यातुन मिळणारे पाणी, उजनीचे पाणी, यामुळे तालुक्याच्या ओलीताचे क्षेत्र वाढले.होते, या विकासाला शेजारच्याची नजर लागली. राजकीय क्षेत्रात पिछाडीवर गेल्यामुळे विकासाला खिळ बसली. इंदापुर राजकीय नेतृत्व काही काळ दुसर्‍या कडे गेले. आणि विकासाची गती पुर्ण पणे मंदावली. त्यातच ! मोठ्या भाऊंच्या मार्गदर्शनातून व जनतेच्या आशिर्वादाने आकाशात एक तारा चमकला. मा.कै.शंकराव पाटील व कै.शहाजीबापु पाटील आणि स्व. नप्रभादेवी पाटील यांचे संस्कार-संस्कृतीत उगवलेला चमकता तारा कधी इंदापुर तालुक्यातील जनतेसह महाराष्ट्राच्या राजकारणातील उगवता सुर्य झाला ते समजलेच नाही. तालुक्यातील मंदावलेल्या विकासाच्या अंधारातून बाहेर काढत प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहचविणारे खरे विकास रत्न, आमचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंञी मा.हर्षवर्धनजी पाटील आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख-लाख शुभेच्छा!!!

इंदापुर तालुक्याच्या विकासाची मुहूर्त मेढ स्व.शंकरराव पाटील (मोठ्या भाऊंनी) रोवली आहे. तर इंदापुर तालुक्याच्या क्षितिज पटलावर कृषी, अर्थिक, शैक्षणिक, सामाजिक,राजकीय क्षेत्रात उच्च प्रगती साधत उंच शिखर बांधुन सोनेरी कळस बसविण्याचे पविञ कार्य या तालुक्याचे भाग्यविधाते मा.हर्षवर्धनजी पाटील साहेब करत आहेत.

इंदापुर तालुक्याच्या वाढत्या विकासाबरोबर चालण्यासाठी निरा आणि भिमा नद्यांचा संगम होऊन तीन दिशांना पाणी आहे. भाटघर आणि खडकवासला कालव्याचे पाणी मधुन वाहत असताना, शेटफळ, कळस, भादलवाडी, वाघाळे, गोखळी ,कचरवाडी सारखे तलाव होते पण शेतीला पुरे पाणी उन्हाळ्यात म्हणजे बाराही महिने मिळत नव्हते . शेतकर्‍यांना शेतीला पाणी मिळत नव्हते. प्रत्येक वर्षी दुष्काळाच्या झळा तालुक्यातील जनतेला, पशु पक्षाला बसत होत्या. गोर-गरीब जनतेच्या कुटुंबाचा अर्थिक गाडा कोलमडत होता. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता. पाणी पाठाने शेतात पुरेशा विजे अभावी देता येत नव्हते. तालुक्यातील युवकांना हाताला रोजगार, शैक्षणिक सुविधा पुरेशा उपलब्ध नव्हत्या.

1995 च्या विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून मोठ्या भाऊंच्या’ मार्गदर्शनातुन आणि जनतेच्या आशिर्वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात मा.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचे रुपाने एक तारा चमकला आणि तोच तारा आज तेजस्वी सुर्य बनुन इंदापुरच्या जनतेच्या आयुष्यात सकाळ घेऊन आला आहे. निरा व भिमा नदीतुन पावसाळ्यातील पावसाचे पाणी वाहुन समुद्राला जात होते.त्या दोन्ही नदीवर कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे बांधुन पाणी आडवले. त्याचा सहकारी व वैयक्तिक लिप्ट करुन शेतीला बाराही महीने शेतीला पाणी देऊन शेतकर्‍यांच्या दारात गंगा आनणारे भगीरथ आहेत. गावच्या शेतीसाठी बारमाही पाणी देतो. सर्‍या काढा ऊसाचे बेणे दाबा म्हणून सांगत हत्तीवरुन मिरवणूक काढत साखर वाटली. देशातील शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून घेणार्‍यानी आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी अनेक पोकळ घोषणा केल्या पण गावांच्या शेतीला बारमाही पाणी दिले नाही. पण या इंदापुरच्या ख-या विकास रत्नाने या गावासाठी नंबर वर का होईना बारमाही पाणी देऊन या भागातील शेतकर्‍यांना आधार दिला.

शेतीला पाणी मिळाले पण वीज पुरेशी नव्हती . ठिकठिकाणी 33के.व्ही. सब स्टेशन तालुक्यात उभारुनपुरेशी वीज उपलब्ध करुन दिली. शेतात पिकणारे डाळिंब, ऊस, पेरु, कांदा यासाठी अद्यावत मार्केटची उभारणी करुन दिली. दुध व्यसायात अनेक अडचणी आल्या पण त्याचे मध्ये अमुल सारख्या दुध कंपनीशी करार करुन शेतकर्‍यांचे दुधाला चांगला मार्ग दाखवून चार पैसे जास्तीचे देण्याचा प्रयत्न केला आहे. ऊसाचे पुर्ण गाळप व्हावे व आपल्याच तालुक्यात युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून कर्मयोगीच्या विस्तारणी करणाबरोबर निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. युवकांचे हाताला काम मिळावे म्हणून लोणी सारख्या माळावर पंचतारांकीत औद्योगिक विकास महामंडळाचे माध्यमातून विविध कंपन्या येण्यासाठी मदत केली.

युवकांना दर्जेदार शिक्षण आपल्याच गावात,आपल्याच तालुक्यात मिळावे यासाठी व्यवसायिक उच्च शिक्षणाची दालणे सुरु केली. तालुक्यात आरोग्याच्या सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून सतत प्रयत्न केले. भाऊ स्वाभिमानी इंदापुर तालुक्याचे खरे विकास रत्न म्हणून ओळखले जात आहेत. या अशा दुरदृष्टीच्या संयमी आणि प्रगल्भ नेतृत्वास वाढदिवसाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा!!!

लेख मांडणी- दिनकर दशरथ नलवडे, गोतंडी (ता.इंदापूर)
संचालक, कर्मयोगी सह.साखर कारखाना लि., बिजवडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!