बारामती(वार्ताहर): ज्यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली असे धाडसी, सिंघम वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कै.अर्जुनराव काळे होते असे प्रतिपादन बारामती शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुनिल मोटे यांनी केले.
काळेनगर येथे आई प्रतिष्ठान व सत्यव्रत अर्जुनराव काळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित बालवाडीत स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त श्री.मोटे बोलत होते. यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
पुढे मोटे म्हणाले की, येणार्या काळात याच जोशाने स्वातंत्र्य दिन साजरा करावा व आपल्या देशाचा नावलौकीक वाढवावा असेही ते म्हणाले.
ध्वजारोहणानंतर चिमुकल्यांना शालेय साहित्य व उपस्थित पालक व नागरीकांना मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी जमीर इनामदार, रफिक शेख, गणेश कुचेकर, शाम सूर्यवंशी, दिलीप काळे, युसुफ तांबोळी, शैलेश भोसले, संदीप कदम, मंगल पवार, संतोष उबाळे, धनंजय पोरे, रितेश काळे, दीपक शिंदे, अनिल इंगोले,भारत गायकवाड, आशिष घोरपडे, नंदू आवटे, आकाश काळे, यथार्थ काळे यांच्यासह काळेनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलाभगिनी व आई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश धालपे यांनी केले तर शेवटी आभार सत्यव्रत काळे यांनी मानले.