बारामती(वार्ताहर): पुण्यानंतर विद्येचे माहेर घर म्हणून ओळखली जाणारी बारामती व या बारामतीत विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली केलेली शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती अशा विद्या प्रतिष्ठान संस्थेचा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण विद्या प्रतिष्ठानचे विश्र्वस्त व मा.ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बारामती टेक्सटाईलच्या अध्यक्षा व विद्या प्रतिष्ठानच्या विश्र्वस्ता सौ.सुनेत्रा पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ऍड.अशोक प्रभुणे, सचिव ऍड.निलीमा गुजर, डॉ.राजेंद्र शहा इ. मान्यवर उपस्थित होते.