बारामती(वार्ताहर): अलिकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्र पुरुषांबद्दल अतिरेकी आणि बेताल विधाने करण्याची चढाओढ पाहायला मिळते याला वेळीच पाय बंद घालण्याची गरज असल्याचे परखड मत राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन शेंडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्र पुरूषांबाबत बेताल वक्तव्य करणार्या संभाजी भिडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलतर्फे बारामती शहर पोलीस स्टेशनला नितीन शेंडे यांच्या नेतृत्वाखाली तक्रार दाखल करण्यात आली याप्रसंगी श्री.शेंडे बोलत होते.
राष्ट्रपुरुषांच्या सतत बेताल वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करणार्या संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणा व निषेध नोंदवीत कायदेशीर गुन्हा दाखल करुन तत्काल अटक करावी असे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना देण्यात आले. तुमच्या भावना वरिष्ठांकडे पोहोचवण्यात येईल असे श्री.तायडे यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष दादा राम झगडे, शहराध्यक्ष स्वप्निल भागवत, राष्ट्रवादी बॉडी बिल्डर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष संतोष जगताप, महिला अध्यक्षा सौ.द्वारका कारंडे, सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा सौ.रेश्मा ढोबळे, सौ.स्वप्ना लोणकर, हारूणबाबा शेख, ऍड. शिवाजी एजगर, संपत बनसोडे, नितीन थोरात, संघटक तनवीर इनामदार, पोपट खडके, दादासो विधाते, गणेश पवार, रियाज शेख, प्रमोद बोराटे, हनुमंत होले, शरद होले, बिल्डर मुन्नाभाई, पोपट कुलथे, अरुण नलावडे, संदिप आढाव, निखिल होले इ. पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देते समयी उपस्थित होते.