निस्वार्थ, संघटनात्मक रासपचे काम करणार्‍या तानाजी शिंगाडे यांची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): निस्वार्थ, संघटनात्मक राष्ट्रीय समाज पक्षाचे काम करणारे इंदापूर तालुका संघटक तानाजी शिंगाडे यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ.महादेव जानकर यांच्या शिफारशीनुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली.

या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, मुख्य महसचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे यांच्या वतीने तानाजी शिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला.

काशीनाथ शेवते मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, इंदापूर तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे संघटनात्मक बांधणीचे काम उभे करण्यामध्ये शिंगाडे यांचे मोलाचे योगदान आहे. गाव तिथे शाखा, घर तिथे कार्यकर्ता हे अभियान तालुक्यामध्ये सक्षमपणे राबवण्याचे काम त्यांनी केले. या कार्याची पावती म्हणून महादेव जानकरांनी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाला निस्वार्थ भावनेने काम करण्याची एक अनमोल संधी दिली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासाला सार्थ ठरत सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करीन असे सत्कारासमयी शिंगाडे यांनी सांगितले.

यावेळी अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ, जामखेड तालुकाध्यक्ष डॉ.प्रकाश कारंडे, जामखेड युवक तालुकाध्यक्ष नंदू खरात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!