इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): इंदापूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील अनेक विद्यार्थी पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कसून सराव केला. त्यांनी प्रामाणिक कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळविले असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील 28 तरूण-तरूणींनी अथक प्रयत्नातून पोलिस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केले. भरणेवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्याप्रसंगी आ.भरणे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, यश प्राप्त केलेल्यांनी समाजाची चांगल्या प्रकारे सेवा करून आई-वडिलांचे नावलौकीक करावे. तुमच्या यशामध्ये आई-वडिल, गुरुजन वर्ग व मित्रांचा मोठा वाटा असुन भावी पोलीसांनी समाजाप्रती आस्था ठेऊन गोरगरीबांची सेवा करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.