अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): आमचे सरकार आल्यावर आम्ही आरक्षण देणार असे म्हणणार्यांनी आता तरी शब्द पाळावा असे लक्ष्मी नरसिंह चरणी अभिषेक घालून साकडे घालताना शशिकांत तरंगे यांनी बोलताना व्यक्त केले.
शुक्रवार दि.18 नोव्हेंबर रोजी नरसिंहपूर या ठिकाणी धनगर ऐक्य परिषद इंदापूर यांच्यावतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी लक्ष्मी नरसिंह चरणी अभिषेक घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री.तरंगे बोलत होते.
तरंगे पुढे म्हणाले की, बारामतीत 2014 साली धनगर समाजाचा आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरबत पाजून उपोषण माघार घेण्यासाठी सांगून आमचे सरकार आल्यास आम्ही आरक्षण देऊ असे त्यांनी सांगितले होते. त्यावरती ते पाच वर्षे सत्तेत होते परंतु त्यांनी आरक्षण दिले नाही. आता तरी त्यावेळेस चा शब्द त्यांनी पाळावा
आत्ताचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांना नरसिंह देवाने सदबुद्धी देवो व आरक्षणाचा तिडा लवकरात लवकर सुटावा या मागणीसाठी नरसिंह चरणी साकडे घालण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी नरसिंह देवाची आरती करण्यात आली. व 21 नोव्हेंबर रोजी इंदापूर या ठिकाणी होणार्या भव्य मोर्चाच्या आयोजनाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्यातील मोटरसायकल रॅली काढून मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती धनगर ऐक्य परिषदेचे सर्वेसर्वा डॉ. शशिकांत तरंगे यांनी दिली.
यावेळी उपस्थित आप्पासाहेब माने, कुंडलिक कचरे, (के.के.) महेंद्र दादा रेडके, सिताराम जानकर, बाळासाहेब नरुटे, विष्णू पाटील, संजय पाटील, वसंत मारकड, हमा पाटील, विजय वाघमोडे, विशाल मारकड, बाळासाहेब चितळकर, संपद सरक, सतीश तरंगे, मोरेश्वर कोकरे व धनगर ऐक्य परिषद समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.