बारामती(वार्ताहर): येथे श्री गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये सहभागी होणार्या सर्व भाविक भक्तांचे व मंडळाचे स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समर्थकांच्या वतीने स्वागत कक्ष उभारून स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्र श्यामसुंदर जेवरे व सहकार्यांनी केले होते. स्वागत कक्षात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या लावलेल्या फ्लेक्सची चर्चा रंगली होती. सर्व मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऍड.सुधीर पाटसकर, दत्तात्रय गावडे पाटील, आलताफ बागवान, गणेशभैया नवले, सतीश घोडके, गणेश वनवे, सोमनाथ मोरे, सुधीर राहतेकर, संदीप अभंग, गणेश कोकरे, आकाश देवकाते इ. सहकार्य केले.
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावतीने भाविक भक्तांचे व मंडळाचे स्वागत कक्ष उभारून सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व कौतुक केले. दरम्यान उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, हनुमंत पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसिलदार विजय पाटील यांनी स्वागत कक्षास भेट दिली.