केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना

योजनेचे स्वरूप
  केंद्र शासनाकडून राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन व बौद्ध या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
  शिष्यवृत्ती अकरावी ते पी. एचडी. व्यावसायिक (डीएड, बीएड, एमएड, आयटीआय) सर्व अभ्यासक्रमांना देण्यात येते. (तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून)
योजनेच्या अटी
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. मागील वार्षिक परिक्षेत किमान 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती तसेच स्टायपेंड योजनेचा लाभार्थी नसावा. अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2 लाख पेक्षा जास्त नसावे. एका कुटूंबातील फक्त 2 अपत्यांनांच सदर योजनेचा लाभ घेता येईल. शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणासाठी विद्यार्थ्याने पुढील वर्गात प्रवेश घेतलेला असावा.तसेच मागील वार्षिक परिक्षेत किमान 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये स्वतःचे खाते उघडणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरूप
  केंद्रशासनाच्या नियमानुसार अभ्यासक्रमाचे शुल्क,शिक्षण शुल्क, परिरक्षण भत्ता हे लाभ देण्यात येतात.
  रक्कम अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ- www.scholarships.gov.in

अधिक माहितीसाठी संपर्क- शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे www.dhepune.gov.in.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!