बारामती(वार्ताहर): कमी कालावधीत शैक्षणिक दर्जा सांभाळीत नावलौकीक मिळविलेल्या समीर वर्ल्ड स्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
15 ऑगस्ट रोजी माजी सैनिक अंकुश रामचंद्र मापटे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवेत कार्यरत असलेले सैनिक अमोल सातपुते, आय.टी.आय.चे प्राचार्य श्री.कुराडे, डॉ.विक्रांत काटे, स्कूलचे चेअरमन अशपाक सय्यद, स्कूलचे ट्रस्टी साकिब सय्यद, स्कूलचे मुख्याध्यापक श्री. रॉबर्ट, उपमुख्याध्यापक सौ.रॉबर्ट उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी परेड करत ध्वजाला सलामी दिली.
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार अशपाक सय्यद व श्री.रॉबर्ट यांनी पुष्पगुच्छ देवून केला. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरूवातीस पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली. सर्व गटातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात भाग घेतला होता. यामध्ये देशभक्तीपर गीते, कराटे ,वेगवेगळी वेशभूषा परिधान केलेली विद्यार्थिनी, विद्यार्थी, वेगवेगळ्या नेते मंडळींची भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली. विशेषतः विद्यार्थ्यांनी पेटी वाद्य सादर केले.
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनापासून ते आभारापर्यंत विद्यार्थ्यांनी जबाबदारी घेतली होती. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीत पुढे आणणे हाच या कार्यक्रमाचा व स्कूलचा मुख्य उद्देश होता.
अध्यक्षांच्या भाषणात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हर घर तिरंगा ही मोहीम राबवली आणि हीच शाळेच्या कार्यक्रमात ही दिसून आली त्यांनी मुलांची खूप कौतुक केले. शिक्षक शिक्षेकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.