बारामती(वार्ताहर): स्वातंत्र्यासाठी जेल भोगणार्या स्वातंत्र्यसेनानी कै.पै.अण्णा शंकर भोकरे यांचे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनामिमित्त स्मरण व अभिवादन कार्यक्रम भिगवण चौकात त्यांचे नातु भोई समाजाचे अध्यक्ष सिध्दनाथ भोकरे व मुलगा मा.नगरसेवक रमेश अण्णा भोकरे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्वातंत्र्यसेनानी भोकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना सिद्धनाथ भोकरे म्हणाले की, माझे आजोबांना देशसेवेचे बाळकडु त्यांच्या वडीलांकडुनच मिळाले होते. त्यांचे वडील व माझे पणजोबा वस्ताद शंकर गंगाराम भोकरे हे त्या काळातील पंचक्रोशीतील नामांकित मल्ल होते. बारामतीत कुस्ती क्षेत्रातील योगदान पाहता त्यांच्या नावाने बारामतीत शंकर भोई तालीम उभारण्यात आली आहे. तसेच माझ्या पणजोबानी 1933 च्या सुमारास बारामती नगरीचे नगरसेवक पद भूषवले होते. आजोबा स्वातंत्र्यसेनानी आण्णा भोकरे यांनी 9 ऑगस्ट 1942 च्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यासाठी त्या काळात 19 ऑगस्ट 1942 ते 14 ऑगस्ट 1943 या एक वर्षाच्या काळात येरवडा कारागृहात तुरुंगवास भोगला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1972 साली स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त त्यांचा देशसेवेसाठी ताम्रपत्र देवुन सन्मान केल्याची आठवण सिध्दनाथ भोकरे यांनी याप्रसंगी करून दिली. देश स्वातंत्र्यानंतर देखील सामाजिक कार्याचा वारसा सुरू ठेवत त्यांनी 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले. आज देखील भोकरे कुटुंबातील सामाजिक पार्श्वभुमीमुळे चौथी पिढी बारामतीत नगरसेवक पद भूषवीत आहे याचा आम्हा भोकरे कुटुंबियांना मनोमन अभिमान आहे. पणजोबा,आजोबांनी देशसेवेबरोबर लोकांसाठी केलेली कामगिरी पाहता, अशा कुटुंबात जन्म घेतल्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचेही भोकरे यांनी याप्रसंगी नमूद केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी नगरसेवक सुधीर सोनवणे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
अभिवाद कार्यक्रमास मा.नगरसेवक जयसिंग देशमुख, सुरज सातव, रमेश अण्णा भोकरे, नवनाथ बल्लाळ, निलेश इंगोले, शेवंतीभाई दोशी, सुभाष जांभुळकर, सुमित रेडे, निलेश मोरे, बाबू मोरे, सोमनाथ नाळे, नवनाथ मलगुंडे, सचिन भुतकर, विठ्ठल दळवी, नागेश कासार, सोमनाथ धनराळे, रणजीत ननवरे, गणेश दळवी,मंदार ढवळेकर, राहुल शेडगे, निलेश पवार, कुंदन पवार, किरण निकम, अभिजीत झगडे, संदीप पोटे, आकाश जाधव, विजय जाधव,वैभव ननवरे, राजू कांबळे, कल्पेश लोणकर इ.मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.