मांग-गारूडी समाजाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

बारामती(वार्ताहर): बारामती शहर व तालुका मांग गारुडी समाज व राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या संयुक्त विद्यमानाने, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील, मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाळे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, मा.नगरसेवक अभिजीत चव्हाण, गणेश सोनवणे, आप्पा अहिवळे, सामाजिक कार्यकर्ते नितीन शेलार, उत्तम धोत्रे, संपादक तैनुर शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवक कार्याध्यक्ष विशाल जाधव, सचिन काकडे, भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक इ.मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यानच्या काळात बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, नगर परिषदेचे माजी सभापती सत्यव्रत उर्फ सोनू काळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मांग गारुडी समाजातील तानाजी पाथरकर, गजानन गायकवाड, सचिन सकट, बापू पाथरकर, राजू खलसे, गोरख गायकवाड यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!