डॉ.अनिल डिसले यांना पी.एच.डी पदवी प्राप्त

विद्यानगरी(वार्ताहर): विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. अनिल डिसले यांनी डॉ. बाबासाहेब आबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील भौतिकशास्त्र या विषयातील पी. एच.डी. पदवी मिळविली आहे.

डॉ.डिसले हे या महाविद्यालयात गेली 20 वर्षापेक्षा अधिक काळ अध्यान अध्यापन करीत आहेत. हे अत्यंत मनमिळाऊ व प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना सदासर्वकाळ मदत करणारे, चिरतरुण व्यक्तिमत्व म्हणून ते महाविद्यालयात सुपरिचित आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. रा.स. बिचकर तसेच विद्याप्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मंडळ यांनी डॉ.डिसले यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!