विद्यानगरी(वार्ताहर): विद्या प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री आ.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 30 जुलै रोजी महाविद्यालयाच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क लिमिटेडच्या अध्यक्षा सौ. सुनेत्रावहिनी पवार व विद्या प्रतिष्ठान संस्थेचे रजिस्टार श्रीश कंभोज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी सामाजिक जाणीव घेवून रक्तदानासारखा चांगला उपक्रम राबवत आहेत ही समाधानकारक गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया सौ. सुनेत्रावहिनी पवारउदघाटन प्रसंगी व्यक्त केली.
या शिबिरामध्ये महाविद्यालयातील जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये 738 रक्ताच्या बाटल्याचे संकलन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्था अध्यक्ष कु. सुमित शहाजी पवार व त्यांचे सर्व विद्यार्थी सहकारी मित्र यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ.सुधीर लांढे, आर्किटेक्चर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनंजय देशपांडे, महाविद्यालयाचे रजिस्टार सतीश तावरे, प्रसारमाध्यम विभागाचे सुनिल भोसले हे सर्वजण आवर्जून उपस्थित होते. यासंपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. रा.स.बिचकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.