’ट्रुरू व्होटर’ ऍपद्वारे मतदार यादीमधील नाव शोधण्याची सुविधा

बारामती(उमाका): बारामती नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक-2022 ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ’ट्रुरू व्होटर’ या मोबाईल ऍपवर मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या असून या मोबाईल ऍपमुळे मतदारांना प्रभागनिहाय यादीत नाव शोधणे अधिक सुलभ होणार आहे.

शहरातील सर्व मतदारांनी ’ट्रुरू व्होटर’ हे मोबाईल ऍप प्ले स्टोअर वरून आपल्या मोबाईल मध्ये स्थापित करून त्याचा उपयोग मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी करावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!