अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (वार्ताहर): टाळ-मृदगांच्या गजरात, संत तुकारामाच्या जयघोषात, विठुरायाचे नाम घेत पंढरीच्या ओढीने दरमजल करीत निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा लाखो वैष्णवांचा मेळा गोतंडीच्या वेशीवर प्रवेश केला त्यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात पालखीचे स्वागत केले.

गावचे सरपंच गुरूनाथ नलवडे यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली. यावेळी गावचे उपसरपंच परशुराम जाधव, ग्रामसेवक श्री.रणवरे भाऊसाहेब, आप्पा पाटील, दिनकर नलवडे, रवि कांबळे, अनिल खराडे, मारूती नलवडे, अशोक कदम, काशिनाथ शेटे, हौसेराव यादव, पोपट नलवडे, छगन शेंडे, आबा मारकड तसेच ग्रामपंचायत सदस्य च ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी स्थळाची स्वच्छता, स्वच्छ पाणी व उत्तम जेवणाची व्यवस्थेने वारकर्यांनी समाधान व्यक्त केले. गोतंडी गाव ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमली.
गेली दोन वर्ष पालखी सोहळा न झाल्याने गोतंडी ग्रामस्थांची तुकाराम महाराजांच्या पालखीची ओढ लागली होती. अवघ्या चार तासाच्या पालखी थांब्यामुळे सर्व भक्तगणांचा आनंद गगनभरारी घेत होता.