अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): गतालुक्यातील मौजे जंक्शन येथील सध्या राहणार थेरगाव मधील एक सामान्य मुस्लिम कुटुंबातील तमन्ना हमीद शेख या मुलीचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून तिची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल जंक्शन येतील शेख यांच्या घरी इंदापूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागरबाबा मिसाळ व मिसाळ परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन तमन्ना शेख व त्यांचे आई-वडील यांचे सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी सागरबाबा मिसाळ म्हणाले की, तमन्ना शेख हिने आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून आपल्या घराबरोबर गावाचे व तालुक्याचे नाव कमवले आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी अभ्यासाच्या जोरावर वर कोणतेही शिकवणी न लावता नायब तहसीलदार पदापर्यंत कशी मजल मारते असा आदर्श तिने इतर विद्यार्थ्यांपुढे मांडला ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.
या यशाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने तमन्ना शेख व तिच्या आईवडिलांचे अभिनंदन करतो. अशा शब्दात त्यांनी आपली मत व्यक्त केले.