अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी तेवीस वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करून गावोगावी पक्षाच्या शाखा चालू केल्या. आज साहेबांचे कार्य समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वच पदाधिकार्यांनी अजून नेटाने सक्रीय राहावे. आपण सर्वांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.
इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तालुका जनसंपर्क कार्यालयावर शुक्रवार (दि.10जून) रोजी मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा तेविसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी उपस्थित पदाधिकार्यांचे स्वागत करून ध्वजारोहण करून मानवंदना दिली. व कार्यालयात पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, मा.जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,जि.नि.मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, उपाध्यक्ष नवनाथ रुपणवर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड.शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, वरकुटेचे सरपंच बापूराव शेंडे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष तुकाराम करे, संजय देवकर, शिवाजी तरंगे, दादासाहेब भांगे, सोमनाथ जावळे, प्रफुल्ल पवार, नानासाहेब भोईटे, अक्षय कोकाटे, सुनील मोहिते, लक्ष्मण देवकाते, सिताराम जानकर, सचिन देवकर, सुभाष ढरंगे-पवार, शहाचे उपसरपंच दिलीप पाटील, आबा पाटील, दत्ता बाबर,अहेमदरजा सय्यद, महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर, शहराध्यक्षा उमा इंगोले यांसह महिला पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व आजी माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.