बारामती(वार्ताहर): भारतीय बौद्ध महासभा बारामती तालुक्याच्या वतीने दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या नित्यक्रमातील एक भाग म्हणून दररोज प्रभातफेरी काढली जाते.
या फेरीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते. फेरी निघाल्यापासून ते समारोपापर्यंत श्रामणेर बौद्धाचार्य यांच्याबरोबर फेरीपुढे फुलांचा सडा टाकत स्वागत करत आहे.
अमोल ज्वेलर्सचे मालक अमोल वाघमारे यांनी आपल्या निवासस्थानी शिबीरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भोजन दिले. विशेष म्हणजे अमोल वाघमारे यांचे दोन्ही मुलं शुद्धोधन आणि संघर्ष यांना या शिबीरात बसविले आहे. लहानपणापासूनच बुद्ध आणि त्याचा धम्माची गोडी आचरणात आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. अमोल वाघमारे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काय शिकविले जाते या शिबीरात…
श्रामनेरांना बारसे (नामकरण), वाढदिवस, विवाह वाढदिवस, जलदानविधी आदींबाबत बौद्ध धर्मानुसार विधी शिकविले जातात. तसेच संघाचे आचारविचार कसे असावेत, शिबीरात सुमारे 25 ते 30 विषय शिकविले जातात. भगवान गौतम बुद्धांचे चरित्र, त्यांचे जीवन, त्यांचे कार्य याविषयी माहिती दिली जाते.