अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): चालू वर्षी चांगले पाऊसमान होऊन, शेतकरी व नागरीक सुखी समाधानी राहू दे,असे साकडे भैरवनाथ चरणी घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी बावडा गावचे नागरिक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब भैरवनाथाची विधिवत पूजा केली व भैरवनाथाच्या घोड्यावरील मुर्त्यांना श्रीफळाचे तोरण अर्पण केले.
बावडा येथील प्रसिद्ध ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा काल (रविवार) पासून सुरु झाली आहे. भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब भैरवनाथाचे दर्शन घेतले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते छबिना मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील आदी पाटील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर भाविकांच्या गर्दीत सोमवारी रात्री श्रींची पालखी मिरवणूक (छबीना) सुरु झाली. याप्रसंगी काळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. छबिना मिरवणूकीमध्ये हर्षवर्धन पाटील सहभागी झाले. दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व काळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केलेले आहे, अशी माहिती सरपंच किरण पाटील यांनी दिली.