अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): येथील दादासाहेब विठ्ठल मुलमुले यांचे अल्पश: आजाराने दि.3 मे 2022 रोजी पुणे येथे उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले.
एक प्रगतशिल शेतकरी म्हणून त्यांची आगळी वेगळी ओळख होती. त्यांचा मनमिळावू स्वभाव व सतत हासरा चेहरा होता. त्यांच्या जाण्याने गोतंडी गावात सर्वत्र शोककळा पसरली होती. अंतयात्रेस सर्वस्तरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्र्चात आई-वडिल, पत्नी, 2मुले, एक मुलगी, भाऊ-भावजय त्यांची मुले असा परिवार आहे.