अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील रस्ते, गटार, वर्ग खोल्या इमारत, चौक सुशोभीकरण, इत्यादी कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडून 2515 योजनेअंतर्गत 5 कोटी निधी मंजूर झाला असून जिल्हा परिषद स्थानिक विकास निधी मधून 1 कोटी 28 लक्ष इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या मध्ये भाटनिमगाव येथील शेख फरीद बाबा दर्गा मज्जित परिसरात बांधकाम करणे या कामासाठी रक्कम 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी ग्रामस्थांनीराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्या मागणीनुसार 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.शेख फरीद बाबा हे भाटनिमगावचे ग्रामदैवत असून अतिशय जागृत दर्गा म्हणून परिसरात ओळखले जातात. मार्च एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रेचे आयोजन करण्यात येते. यासाठी परिसरातून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.