अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): विकास कामे करण्यासाठी धमक लागते, ती धमक माझ्या रक्तातच आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी केले.
दि.18 मार्च रोजी गोखळी ता. इंदापूर या गावात विविध विकास कामाचे उद्घाटन व भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस डॉ.शशिकांत तरंगे, माजी जि.प. सदस्य प्रताप पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रशांत पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकाळ, जि.प. सदस्य अभिजीत तांबिले, जि.प.माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, महिला तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर, कार्याध्यक्ष अतुल झगडे, पं.स.सदस्य सतीश पांढरे, युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष सचिन खामगळ, सोशल मीडिया प्रमुख हामा पाटील इ. मान्यवरांसह गोखळी गावचे सरपंच अलका बापू पोळ, उपसरपंच सचिन तरंगे उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.भरणे म्हणाले की, विरोधकांनी खोटी आश्र्वासने देऊन भोळ्याभाबड्या जनतेला अजुन किती दिवस फसवणार आहात असा सवाल भरसभेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केला. गेल्या 19 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात गोरगरीब, मागासवर्गीय जनतेची कामे राहून गेली. ती कामे आपणा सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून आपण मार्गी लावत आहोत.
ते पुढे म्हणाले की, प्रदिपदादा गारटकर तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात तुम्ही पुढाकार घ्या व माझ्यासह विरोधक व पुढारी यांची नार्को टेस्ट करा, मग कळेल गोरगरीब मागासवर्गीय माणसांची काळजी कोणाला आहे असा टोला हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता लगावला. 2012 पूर्वी तालुक्यातील रस्ते व पाणी यांची काय अवस्था होती हे आठवा. तालुक्यामध्ये सध्या एक किलोमीटरचा पण रस्ता शिल्लक ठेवला नाही. गोखळी तरंगवाडी गावातील माणसे माझ्या घरचे आहेत, त्यामुळे तुमच्याशी हितगुज करण्यासाठी उशिरा आलोय. माझ्या विधानसभेच्या प्रच वेळी या गावात मी आलो नसताना या गावाने भरभरूनवेळी या गावात मी आलो नसताना या गावाने भरभरून मतदान रूपी आशीर्वाद मला दिले हे उपकार मी कधीही विसरणार नाही असेही शेवटी म्हणाले.
यावेळी दोन्ही गावचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक व दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.