बारामती(उमाका): स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती प्रशासनातर्फे तहसिल कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तहसिल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास तहसिल कार्यालयातील आर.आर.तुंगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.