बारामती(वार्ताहर):कोरोना महामारी सगळीकडे थैमान घालत असताना आपल्या जिवाची पर्वा न करता परिवाराची पर्वा न करता आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारे पोलीस दलातील अधिकारी पदाधिकारी आणि सर्वच कर्मचारी यांनी केलेले काम निश्चितच स्तुत्य असून समाजाला ते अभिमानास्पद वाटत असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेल कार्याध्यक्ष नितीन शेंडे यांनी केले.
बारामती येथे पोलीस अधिकारी यांच्या स्नेहमेळाव्या श्री.शेंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिटायर सहाय्यक फौजदार अण्णा जाधव होते.
1984 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेमध्ये रुजू झालेले सध्या कार्यरत असलेले व निवृत्त झालेले अशा सर्वांचा स्नेहमेळावा बारामती येथे संपन्न झाला. मूळचे ग्वाल्हेर संस्थानातील असलेले व त्या वेळी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे कै.उदयसिंह राजवाडे यांच्या कार्यकाळात हे सर्व अधिकारी पदाधिकारी या सेवेमध्ये रुजू झाले. राजवाडे साहेबांनी त्यांना सुरुवातीच्या काळात खूप सहकार्य केले असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र घाडगे तसेच रिटायर सहा. फौ. सुरेश पवार, शरद वेताळ, सुनील बांदल, अरुण बनकर, आत्माराम गावडे, संदिपान माळी, प्रदीप जगताप, श्री कोळेकर, वैजनाथ गावडे पाटील, बलभीम टाकळी इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते . . यावेळी अनेक मान्यवर अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक अरुण बनकर यांनी केले स्वागत प्रदीप जगताप व आत्माराम गावडे यांनी केले आभार शरद वेताळ यांनी मानले. या कार्यक्रमास पुणे सातारा नगर जिल्ह्यातून पोलीस दलातील मान्यवर अधिकारी उपस्थित होते.