अपघाती मृत्यूची बातमी म्हणजे सदर घटनेचा परिसर व तेथील नागरीक हळहळ व्यक्त करीत असतात. अपघात होऊ नये म्हणून गृह खात्यातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह राबविला जातो. डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा व जानेवारीचा पहिले दोन आठवडे अपघात होत असतात.
अपघात होऊ नये म्हणून संबंधित गृहखात्याची जबाबदारी असते. रस्ते सुस्थितीत असले तरी चालकाने आपल्या ताब्यात असणार्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण राखले पाहिजे. रस्ते नादुरूस्त असले तरी वाहन चालकाला अपघाताला सामोरे जावे लागते. बारामती येथील माजी नगरसेवक श्रेणिक भंडारी यांची पत्नी, मुलगा, बहिण व एक महिला गंभीर जखमी असल्याने तिला पुणे येथे उपचारासाठी तातडीने नेण्यात आले. दि.18 जानेवारी रोजी पुण्याहून येत असताना तरडोली गावात ट्रॉलीला वाहन धडकल्याने जागीच तिघांचा मृत्यू झाला व एक जण अत्यावस्थेत आहे.
दरवर्षी विविध कारखान्यावर गृहखात्यामार्फत काढण्यात येणार्या आदेशाप्रमाणे परिवहन विभाग कारखान्यात असणार्या ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाड्यांना रिफलेक्टर लावण्याचे काम केले जाते. आज याच ट्रॉलीच्या मागे रिफलेक्टर असते तर आज भंडारी कुटुंबियातील व्यक्तींनी आपला जीव गमावला नसता. या अपघातास जबाबदार कोण? हा खरा प्रश्र्न आहे.
वाहन धडकीस वाहनाच्या आकारामान, वाहनाची गती, रस्त्याचे प्रकार, वाहन चालकाची कसब, व व्यवहार इत्यादी घटक कारणीभुत असतात. रत्यावरच्या वाहनाची संख्या, वाहनामुळे झालेले प्रवास बघता वाहन अपघातांची आकडेवारी जरी फार कमी असली तरीही अपघातास कारणीभुत वरील घटक टाळल्यास ते अजून कमी करता येतील. भारतात सुद्धा अपघाताचे दर वाढत असून रस्त्यावरील वाढलेली रहदारी, वाहन संख्या, वाहतूक संबंधी नियमांचा योग्य पालन न होणे, सर्वसामान्यांमध्ये वाहतूक नियम बद्दलचे अज्ञान ही कारणे प्रामुख्याने जबाबदार आहेत.
देशात अपघातात होणारा मृत्यू याची आकडेवारी जास्त आहे. ही आकडेवारी कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आजही परिवहन विभागात वाहन परवाना काढतेवेळी चाचणीची पाहणी केली असता, कसे अधिकृत परवाना धारक चालक बाहेर पडतात हे कळेल. एखाद्या मध्यस्थीच्या माध्यमातून आलेला वाहन परवाना त्या वाहन चालकाकडे पाहिले सुद्धा जात नाही तो कसा वाहन चालवतो, नियमांचे पालन करतो का इ. बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. कोणाची मध्यस्थी न घेता स्वत: वाहन परवाना काढण्यासाठी गेले असता, त्या वाहन चालकास विविध प्रश्र्नांचा भडीमार केला जातो. तो वाहन सुरू करण्यापासून ते ट्रॅकमधून बाहेर येईपर्यंत त्याच्याकडे पाहिले जाते असा दुजाभाव याठिकाणी पहावयास मिळतो. ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी मात्र, यास वाहन परवाना कोणी दिला, कोणाच्या माध्यमातून गेला याचा विचार केला जात नाही त्याचा विचार केला तर वाहनाचे नियम, अटी तंतोतंत पाळणारी फौज बाहेर पडेल व अपघातावर नियंत्रण येईल.