201 बारामती विधानसभा मतदार याद्यांचा पुर्नरिक्षण कार्यक्रम तारखा जाहीर

बारामती(उमाका): मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुर्नरिक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, नाव वगळणी केली जाणार आहे. सर्व मतदारांनी त्यांचे मतदार यादीत नाव असलेची खात्री करावी. जर यादीत नाव नसेल तर आपण वास्तव्य करीत असलेल्या भागासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे ते आपण मतदान करीत असलेल्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. मतदार नोंदणीकरीता अर्ज मोहिमेच्या तारखांना 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर या दिवशी नेमूण दिलेल्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

जास्तीत जास्त मतदारांनी नाव नोंदणी अर्ज दाखल करावेत. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. ऑनलाईन नाव नोंदणी nvsp.portal किंवा voter helpline app वर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!