पश्र्चिम महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये सर्वाधिक मृत्यू व कोरोना बाधित रूग्ण : आज बारामतीत 28 कोरोना बाधीत

वतन की लकीर (ऑनलाईन): पश्र्चिम महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये सर्वाधिक मृत्यू व कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामीण भागात मृत्यूचा दर वाढलेला आहे.

ग्रामीण भागात अंगी येणार्‍या ताप व सहआजाराबाबत रूग्ण हलगर्जीपणे वागत आहेत. ग्रामीण भागात कोरोनाच्या चाचण्या न करण्याचे प्रमाण जास्त आहे. आलेल्या तापाकडे दुर्लक्ष यामुळे वैद्यकीय उपचार उशिरा सुरू होतो त्यामुळे प्रकृती ढासळते. या दुर्लक्षपणामुळे ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

ज्याठिकाणी मृत्यूचा दर जास्त आहे त्याठिकाणी लसीकरणाचा वेग तपासणे महत्वाचे आहे. ऑगस्टमध्ये दीड लाख रूग्णसंख्येची नोंद झाली आहे. ऑगस्टमध्ये मृत्यूची संख्या सुद्धा जास्त आहे.

बारामतीत दि.01 ऑक्टोबर 2021 रोजी दिवसभरात बारामती शहरातून 15 तर ग्रामीण भागातून 18 रुग्ण असे मिळून 28 कोरोना बाधित रुग्ण संख्या आढळून आले आहेत.

काल बारामतीत 292 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते त्यापैकी 07 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकही रुग्ण प्रतिक्षेत नाही. इतर तालुक्यात 03 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

काल खाजगी प्रयोगशाळेत 63 रूग्णांची आरटी-पीसीआर तपासणी केली असता 08 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

1105 रुग्णांची ऍन्टीजन तपासणी करण्यात आली यामध्ये 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले आहे.

म्युकर मायकॉसिसचे एकुण 40 रूग्णांपैकी बारामती तालुक्यातील 31 तर इतर तालुक्यातील 09 रूग्ण आहेत. यापैकी उपचार घेणारे 04 रूग्ण आहेत.

काल दिवसभरात बारामतीत एकूण 28 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बारामतीत 29 हजार 976 रुग्ण असून, बरे झालेले 28 हजार 997 आहे. आज डिस्चार्ज 52 असुन, आतापर्यंत मृत्यू झालेले 756 असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!