बारामती(वार्ताहर): आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरीकांना रोटरी क्लबच्या वतीने विनामूल्य कोविड-19 लसीकरण करण्यात आले. बारामती मार्केट यार्ड येथभल हमाल, कामगार व इतर श्रमजिवी वर्गातील 200 महिला व पुरूषांना लसीकरण करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बारामती, रोटरी डीस्ट्रीक-3131, बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विनामूल्य लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव गावडे यांनी केले.
यावेळी बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष महावीर शहा वडूजकर, चेअरमन मिलिंद सालपे, सेक्रेटरी सुजय निंबाळकर, राजेश दोशी, यश संघवी, बाळासाहेब फराटे, नीलेश भिंगे इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास रोटरी डिस्टिक 3131 यांनी अल्प किंमतीत लस उपलब्ध केली. रोटरी क्लब बारामती व बारामती मर्चंट असोसिएशन यांनी आर्थिक मदत केली व मेहता हॉस्पिटल बारामती यांनी लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणा व कर्मचारी देऊन लसीकरण पूर्ण केले. या कार्यक्रमा दरम्यान बारामती नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांनी भेट दिली.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब बारामती अध्यक्ष संजय दुधाळ, सेक्रेटरी रविकिरण खारतोडे, पार्श्वद्र फरसोले, विजय इंगळे, स्वप्नील मुथा, निखील मुथा प्रतिक दोशी, कौशल शहा, अलिअसगर बारामतीवाला, दत्ता बोराडे, मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन हिरेमठ, सौ.सुदर्शना दुधाळ, सौ.पद्मजा फरसोले व रोट्रॅक्ट क्लब बारामतीचे अध्यक्ष आदित्य भावसार व पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले. बारामती मर्चंट असोसिएशन हॉल, मार्केट यार्ड, बारामती येथे सर्व रोटरी सदस्य व पदाधिकारी यांनी कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम पार पाडला.