बारामती: समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस तहसिलदार विजय पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नायब तहसिलदार(महसुल) महादेव भोसले, नायब तहसिलदार (निवडणूक) पी.डी.शिंदे व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.