बारामती(उमाका): मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि.9 ऑगस्ट 2021 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी करणे व योग्य प्रकारे विभाग /भाग तयार करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पुनरिक्षण उपक्रमामध्ये दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे. दि.1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्विकारणे. दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी दावे व हरकती निकालात काढणे. विशेष मोहिमा दावे व हरकती स्विकारण्याच्या कलावधीत होणार आहेत. दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी, 201 बारामती विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.