अशोक कांबळे यांजकडून..
बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या 62व्या जन्मदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत वंजारवाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बारामती आयोजित कोविड योद्धा पुरस्कार वितरण सभारंभ सोहळा ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, रणजित जगताप, अजित चौधर, यशवंत चौधर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये डॉक्टर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, प्राथमिक शिक्षक – शिक्षिका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कर्मचारी, वाहनचालक, अशा कोरोना योद्धा चा सत्कार सन्मानपत्र, शाल व श्रीफळ , गुलाबपुष्प, तसेच चषक देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वंजारवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद चौधर, सदस्य मोहन चौधर, बबन सावंत, ग्रामसेवक निलेश लव्हटे व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अत्यंत नियोजनबद्दपणे केले.