मुंबई : खासगी शाळांच्या शुल्करचनेवरून पालक आणि संस्थाचालकांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमअंतर्गत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एम. ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय पुनरीक्षण समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये सनदी लेखापाल व सेवानिवृत्त शिक्षण संचालक सदस्य असतील.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या पाच विभागांसाठी विभागीय शुल्क नियामक समित्याही नेमण्यात आल्या आहेत. सर्व समित्यांच्या पदसिद्ध सदस्य सचिवांना समित्यांचे कामकाज तात्काळ सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
पालकांच्या शुल्कासंबंधीच्या तक्रारींची तड लावण्याची जबाबदारी या समित्यांवर असेल. करोनाकाळात पालक आणि संस्थाचालकांमध्ये शालेच्या शुल्कावरून वाद उद्भवत आहेत. तरीही या समित्या नेमण्यात हलगर्जी करणार्या शालेय शिक्षण विभागाला उच्च न्यायालयाने धारेवर धरत तात्काळ या समित्या नेमण्याचे आदेश दिले होते.
पाच ठिकाणी विभागीय समित्या – राज्यस्तरीय समितीचे मुंबईचे कामकाज चर्नी रोज येथील जवाहर बालभवन येथून चालेल. -022-23630081, 400004, 23630090, 23630086 या दूरध्वनी तर dydemumbai@yahoo.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. मुंबईचे विभागीय शुल्क नियामक समितीचे कामकाजही येथूनच चालेल. इतर विभागीय समित्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पुणे- 17, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ पुणे-411001 (020) 26122217,26125696, 23630090 ई-मेल: dydpune@gmail.com नाशिक- विभागीय आयुक्त कार्यालय आवार, जेत रोड, नाशिक रोड, नाशिक-422101(0253) 2454910 ई-मेल: dydnashik@gmail.com नागपूर- बालभारती, धंतोली गार्डन जवळ, धंतोली नागपूर- 440012 (0712) ई-मेल: dydnagpur@rediffmail.com औरंगाबाद- मुलींचे आयआयटी जवळ, भडकल गेट मीपा परिसर, औरंगाबाद-431001 (0240) 2336318/ 2334379 ई-मेल rmsadydeaurngabad@ gmail. com