बारामती(वार्ताहर): डॉक्टर्स डे निमित्त येथील इंडियन मेडिकल असोशिएशन बारामतीच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन नगरसेवक सुरज सातव यांच्या हस्ते तर आय.एम. ए. महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ.अशोक तांबे, डॉ.आर.पी. राजे, मेडोकोज गिल्डचे अध्यक्ष डॉ.संजय पुरंदरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.
डॉक्टर्स डेच्या निमित्ताने बारामतीच्या डॉक्टरांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर कौतुकास्पद असल्याचे मत नगरसेवक सुरज सातव यांनी यावेळी बोलतना व्यक्त केले व्यक्त केले.
यावेळी आय एम एचे माजी अध्यक्ष डॉ. अमरसिंह पवार, डॉ. सौरभ मुथा, मेडिकोज गिल्डचे अध्यक्ष डॉ. संजय पुरंदरे, महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी बापू भोई, डॉ. दीपिका कोकणे. डॉ. मोहन पाटील, डॉ. गोकुळ काळे, डॉ.अश्विनकुमार वाघमोडे, डॉ.राजेंद्र मुथा इ.उपस्थित होते.
बारामती येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचालितच्या लेट माणिकबाई चंदुलाल सराफ या रक्त पेढीने रक्त संकलन केले. तर आय. एम. ए बारामतीच्या अध्यक्ष डॉ.विभावरी सोळूखे, सचिव डॉ.संतोष घालमे यांनी उपस्थित मन्यवराचा स्वागत केले.