बारामती(वार्ताहर): विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलाढाना , नागपूर, वर्धा, यवतमाळ, जिल्हे व राजुरा तालुका सोडून चंद्रपूर जिल्हा याप्रमाणे र्वरित राज्यांतील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव संमत करण्यात आला. या निर्णयाचा फायदा कैकाडी समाजातील अंदाजे 1.5 लाख लोकसंख्येस मिळेल.
लसीकरण वाढीव डोसेस
केंद्र सरकारने राज्यास प्रति महिना लसींचे किमान 3 कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत असा ठराव आज विधानमंडळात मंजूर करण्यात आला असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशनात करण्यात आला.
राज्यात 10 लाख किमान व कमाल 15 लाख लसीकरण दररोज करू शकतो. दोन तीन महिन्यांच्या आत वेगाने लसीकरण करून संपवायचे आहे. राज्यात महिनाभरात 3 कोटी लसीकरण करू शकतो.