देशपांडे विद्यालयात योग सप्ताह

बारामती (वार्ताहर): म.ए.सो.चे कै.ग.भि. देशपांडे माध्य. विद्यालय बारामती विद्यालयात जागतिक योगदिनानिमित्त 21 जून पासून पुढील सात दिवस योगसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये सूर्यनमस्कार , योगासने, प्राणायम यांचा योगाभ्यास घेण्यात येणार आहे.

21 जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून जगभरात साजरा करतात. या निमित्ताने संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने ऑनलाईनच्या माध्यमातून योगदिन साजरा करण्यात आला. प्रशालेचे योगशिक्षक श्री. दादासाहेब शिदे सर यांनी सूर्यनमस्कार योगासने , प्राणायाम या प्रात्यक्षिकांचा योगाभ्यास घेतला.ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक या योगाभ्यास सामील झाले होते. हा योगाभ्यास पुढील सातदिवस घेतला जाणार आहे. या योगसप्ताहाचे नियोजन क्रिडाप्रमुख श्री कुमार जाधव , श्री. अनिल गावडे व सर्व क्रिडाशिक्षकांनी केले.

या योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक उमेद सय्यद सर, पर्यवेक्षिक सौ.रोहिणी गायकवाड, पर्यवेक्षक राजाराम गावडे, धनंजय मेळकुंदे , शेखर जाधव व प्रशालेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक – शिक्षिका सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!