बारामती(वार्ताहर): बारामती येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत दर मंगळवारी व शुक्रवारी तेलबियाचे होणार्या लिलावात 8 जनू 2021 रोजी झालेल्या लिलावामध्ये सोयाबिनला रु.7229/- प्रतिक्विंटल असा व सुर्यफुलाला रु.6500/- प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. तसेच बाजार आवारात साधारण 492 क्विंटल आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती वसंत गावडे यांनी दिली.
बाजार आवारामध्ये तालुक्यासह माण, इंदापुर, दौड, फलटण, करमाळा याभागातील शेतकरी आपला शेतमाल येथे विक्रीस आणतात. मार्केटमध्ये बाळासाहेब फराटे, शिवाजी फाळके, वडुजकर, वैभव शिंदे, आप्पा मासाळ, चंद्रकांत पिसाळ असे आडतार असून सोयाबिनला आप्पा मासाळ व सुर्यफुलाला चंद्रकांत पिसाळ यांचे आडतीवर सर्वाधिक दर मिळाला आहे.
बाजार समीतीमध्ये प्रमुख खरेदीदार संभाजी किर्वे, संतोष श्रीमल गुगळे, जगदीश गुगळे, बाळासो फराटे हे चढी बोली लावत असलेने बाजार भावात तेजी आहे असे उपसभापती दत्तात्रय सणस यांनी सांगितले.
बारामती व सुपे येथील भुसार बाजार पेठेत शेतमाल आलेनंतर प्रथम इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर चोख वजन केले जाते. उघड लिलाव होऊन लगेच कुठलीही नियम बाह्य कटोती न होता त्याच दिवशी पट्टी शेतकर्यांना व्यापारी देत असलेने विश्र्वासाने शेतकरी बारामती मार्केट मध्ये शेतमाल विक्रीस आणतात असे समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी त्यावेळी सांगितले.