गाव ही समुह शक्ती आहे. गावांनी मनावर घेतल्यास किती मोठं परिवर्तन होऊ शकतं हे महाराष्ट्राने ग्राम स्वच्छता सारख्या योजनातून पाहिलं आहे. गावांचा कायापालट झाल्याचे चित्र देशाने पाहिले आहे. त्यामुळे कोरोना सारखा संसर्ग सुध्दा गाव एकत्र येऊन हद्दपार करु शकतो म्हणून राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव योजना सुरू केली आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्ह्यात सुरू झालेल्या या चळवळीचा हा आढावा इतर गावांना मार्गदर्शन ठरावा म्हणून देत आहोत..
ग्रामपंचायत धामणी, ता.आंबेगाव जि.पुणे कोरोनामुक्तीकडे..
ग्रामपंचयतीची जनजागृती मोहिम धामणीगाव आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एक प्रमुख गाव म्हणून ओळखले जाते, गावामध्ये 1960 पासून प्राथमिक आरोग्यकेंद्र आहे, गावची लोकसंख्या 2814 आहे. ग्राम दक्षता समिती सदस्य यांच्या ग्रामस्था बरोबर दर पंधरा दिवसाला बैठका व गृह भेटी घेण्यात येत. कोविड -19 आजाराबाबत विविध उपाययोजना केल्या. ग्रामसुरक्षे यंत्रणेमार्फत कोरोना उपयोजना मार्गदर्शन सूचना व लसीकरणासाठी आवाहन भ्रमणध्वनीद्वारे केले. लोकसहभाग, विविधसंस्था व कंपन्या यांच्या वर्गणीतून पाच हजार जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. घंटागाडीद्वारे व लाऊडस्पीकरद्वारे जनजागृती करण्यात आली.
सर्व ग्रामस्थांना मास्कचा योग्य वापर व वारंवार हातस्वच्छ धुणे याबाबत प्रात्यक्षिक देऊन जनजागृती करणेतआली.,ग्रामपंचायत पातळीवरील शासकीय कर्मचारी व त्या त्या वॉर्डातील सदस्य यांच्या वारंवार गृहभेटीद्वारे जनजागृती करणेत आली आहे, जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आलेले 50 जनजागृतीचे फ्लेक्स व ग्राम पंचायतीमार्फत तयार करणेतआलेले फ्लेक्स गर्दीचे ठिकाणी व चौकात लावणेत आले.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केलेल्या सुविधा
ग्रामपंचायती मार्फत 16 टीम तयार करण्यात आलेली असून त्यांना 16 पल्स ऑक्सिमीटर देण्यात आलेले आहेत. गावात 5000 व्यक्तींना मोफत मास्क् वाटप करण्यात आले. ग्रामपंचायती मार्फत स्वस्तधान्यवाटप योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरपोच सुविधा उपलब्ध करणेतआली, विविध कंपन्या, स्वयंसेवीसंस्था व देणगीदार यांचेमार्फत 400 अन्नधान्य किटवाटप करणेत आलेलेआहे., शरद भोजन योजना व शालेय पोषण आहार योजने अंतर्गत घर पोच सुविधा उपलब्ध करुनदेणेत आली. विविध कंपन्या, स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांचे मार्फत 400 मेडीकल किट वाटप करण्यात आलेले. ग्रामपंचायती मार्फत सर्व 648 कुटूंबांना 2 वेळा अर्सेनिकअल्बम व व्हीटॅमिनसी गोळयांचे वाटप व साबण वाटप करण्यात आले. ग्रामपंचायती मार्फत वाडयावस्त्यां मध्ये निर्जंतूकीकरण करणेकरीता स्प्रेपंप व स्वयंसेवक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
धामणी हे मुख्य लसीकरण केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी तब्बल 6797 नागरिकांचे लसीकरण आत्तापर्यंत झालेले आहे. तालुका प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी या सर्वांच्या सहकार्याने व सर्व लोकप्रतिनीधी यांच्या मार्गदशनाने गावातील वय वर्ष 45 च्या पुढील नागरिकांचा पहिला डोस 100 टक्के लसीकरण पूर्ण केले.
कोविड-19 आजाराबाबत गावां मधील कुटूंब निहाय सर्वेक्षणे- ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व शिक्षक यांना कुटूंब वाटप करुन देऊन त्यांचे मार्फत नियमित सर्वेक्षण व तपासणी केली जाते. धामणी गावात टेस्टींग कॅम्प आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये गांव व परिसरातील येणारे 500 ग्रामस्थांची टेस्टींग करण्यात आली.
गावामध्ये नियमांचे पालन करत नसलेल्या नागरिकांवर कार्यवाही केली. मास्कचा वापर न केलेने वसूल केलेल्या दंडाची रक्कम-तीन हजार रुपये, दुकानदार, व्यावसायिक व व्यापारी यांना केलेल्या दंडाची रक्कम एक हजार रुपये, प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळां मध्ये स्त्री व पुरुषयांचे करीता स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करणेत आले. संभाव्य तिसर्या लाटे करीता नियोजन- विलगीकरण कक्ष स्थापन करणे, लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे व त्यांचे करीता ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करणे, कंपन्या, स्वयंसेवीसंस्था, सदस्य यांच्या नियोजन बैठका घेणे. ग्रामपंचायती मार्फत रुग्णवाहिका खरेदी करणे करीता 2,00,000/- वर्गणी देण्यात आली.
सौजन्य : दत्तात्रय कोकरे, माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय पुणे.