महिलांची सोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा संपन्न

बारामती(उमाका):खरीप हंगाम 2021 अंतर्गत क्रॉपसॅप योजनेंतर्गत सोयाबीन पीकाची महिला शेतीशाळा मौजे निरावागज येथे कोविड 19 च्या नियमांचे पालन करून पार पडली.

कृषि विभागाच्या निर्धारित कार्यक्रमानुसार निरावागज येथे महिलांची निवड करून व त्यांचे वेगवेगळे गट करून सोयाबीन पीकाची शेतीशाळा घेण्यात आली. यामध्ये महिलांना सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता तपासणी, बियाण्यास बिजप्रक्रीया कशी करायची, रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करणे, हूमणी किड नियंत्रणसाठी प्रकाश सापळे, फळबाग लागवड इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या शेतीशाळेस ग्रामपंचायत सदस्या शितल धायगुडे, बचत गट अध्यक्षा तसेच महिला मोठ्या संख्येन उपस्थित होत्या. या शेतीशाळेस मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!